महाराष्ट्रलोकसेवा हक्क अधिनियम आपली सेवा आमचे कर्तव्य
श्री देवेंद्र फडणवीस
माननीय मुख्यमंत्री
श्री एकनाथ शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री
श्री अजित पवार
माननीय उपमुख्यमंत्री
जलद सेवा
जलद सेवा
लोकसेवा मिळवण्याची प्रक्रिया झाली जलद. दिलेल्या कालावधीत अधिसूचित सेवा मिळण्याची हमी. विलंब झाल्यास अथवा अर्ज फेटाळला गेल्यास अपील करण्याची संधी.
प्रमाणपत्र प्राप्त करण्यासाठी २ ते ३ ठिकाणी रांगा लावायची किंवा संबंधित कार्यालयात वारंवार फेऱ्या मारण्याचीही आवश्यकता नाही.
आमच्या पोर्टलला भेट द्या, अर्जासोबत जोडावयाच्या कागदपत्रांचे तपशील लक्षात घ्या, आवश्यक कागदपत्रे आणि शुल्कासह आमच्या सेवा केंद्राला भेट द्या. केंद्र चालक तुमचा अर्ज ऑनलाईन भरून देईल आणि तो भरल्याची पोचपावतीही देईल. विशिष्ट निर्धारित कालावधीत हवे असलेले प्रमाणपत्र तुम्हाला घरपोच प्राप्त होईल.
सेवा आपल्या दारात
सेवा आपल्या दारात
लोकसेवा प्राप्त करण्यासाठी आता रांगेत उभे राहण्याची गरज नाही. घर बसल्या 'आपले सरकार' पोर्टल द्वारे ऑनलाईन अर्ज सादर करण्याची सुविधा.
केंद्राला भेट द्या आणि कागदपत्रे सादर करा. अगदी सोपे !!!
सहज पोहोच
सहज पोहोच
विविध विभागांच्या सेवा आता एकाच ठिकाणी उपलब्ध. अपीलही ऑन-लाईन करता येणार.
केवळ एक क्लिक करा, जवळचे सेवा केंद्र शोधून काढा आणि केंद्राला भेट द्या.
काही सेवांसाठी तुम्ही स्वत:सुद्धा ऑनलाईन अर्ज भरू शकता.
सोपी शुल्कभरणा
सोपी शुल्कभरणा
सेवा शुल्क अत्यंत सोप्या व सुरक्षित पद्धतीने पोर्टल द्वारे जमा करण्याची सुविधा.
तुम्ही नेट बँकिंगद्वारे सहज शुल्क भरणा करू शकता.
वापरण्यास सोपे
वापरण्यास सोपे
माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने निर्माण केलेली वापरण्यास सोपी कार्यपद्धती. अर्ज करणे, कागदपत्र जोडणे, अर्जाचा मागोवा घेणे सोपे.
आमची यंत्रणा आणि केंद्र चालक आपल्या सहाय्यास तत्पर आहेत. त्यांचा अनुभव तुमच्यासाठी निश्चितच मैत्रीपूर्ण ठरेल.
वेळेची बचत
वेळेची बचत
कमीत कमी कागदपत्रांसह ऑन-लाईन अर्ज करण्याच्या सुविधेमुळे वेळ आणि पैशांची बचत. पाठपुराव्यासाठी शासकीय कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही.
आमच्या केंद्राला भेट द्या, प्रक्रिया पूर्ण करा आणि निर्धारित वेळेत तुम्हाला हवे असलेले प्रमाणपत्र/दाखला घरपोच प्राप्त करा.